रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या सरींचा पाऊस पडत आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानेही पुढील चोवीस तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे.

जिल्ह्यात बुधवार सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७.७४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ८.२५, खेड ६.८५, दापोली ८.१४, चिपळूण २४.३३, गुहागर ८, संगमेश्वर २.०८, रत्नागिरी ३.४४, लांजा ३, राजापूर ५.६२ मिमी नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. ५) रात्री थांबूनथांबून सरी कोसळत होत्या. सकाळच्या सत्रात जिल्ह्यात सर्वत्र पावसाची नोंद झाली. मात्र दुपारनंतर कडकडीत उन पडले होते. सायंकाळी पुन्हा आकाश ढगाळलेले होते. सध्या भातलावणीची कामे पूर्ण झाल्यामुळे शेतीला पाण्याची गरज आहे. पावसाने विश्रांती घेतली, तर भातशेतीवर कीडरोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रत्नागिरीला यलो अलर्ट दिल्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 07-08-2025

Shanti2