संगमेश्वर : पूर शाळेत बनवल्या जवानांसाठी राख्या

पावस : संगमेश्वर तालुक्यातील पूर प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी तयार केलेल्या राख्या गावातील माजी सैनिक सुभेदार अशोक झेपले यांच्याकडे सुपूर्द करून त्या भारतीय सीमेवरील जवानांसाठी रवाना करण्यात आल्या. भारतीय जवान हा देशाचा कणा आहे. प्रत्येक सणांपासून दूर असणाऱ्या या जवानांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त स्नेह, आपलेपण, जिव्हाळा जपून त्या सर्वांप्रति आदर आणि अभिमान व्यक्त करण्यात आला. झेपले यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सैनिकांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका आरती भालेकर, कलाशिक्षक राजेश सावंत, समीर मोहिते, वृषाली आगळे या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्नेहा वेले, उपाध्यक्ष विनायक वेले, सरपंच सुबोध पेडणेकर, उपसरपंच संजना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन कांबळे, मंगेश वेले, संजय झेपले, माजी तंटामुक्त अध्यक्ष महेश झेपले, पोलिसपाटील सुरेश वेले यांनी कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 07/Aug/2025

Shanti 3