रत्नागिरीत सहकार न्यायालयासाठी जागा उपलब्ध होण्याची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहकार न्यायालय नाही. अलिबाग येथील सहकार न्यायालयाचे न्यायाधीश रत्नागिरी येथे कॅम्प लावतात. त्यासाठी स्वतंत्र अशी जागा उपलब्ध नाही. यासाठी रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांना भेटून निवेदन दिले. न्यायालयाच्या नवीन इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली असून, न्यायमूर्ती डिगे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

पूर्वी रत्नागिरी जिल्हा सहकारी कं बँकेच्या सभागृहात न्यायालय भरवले जात होते; परंतु बँकेची नवीन इमारत बांधल्यानंतर तिथे जागा उपलब्ध नाही. यासाठी रत्नागिरी बार असोसिएशनने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर त्यानुसार अध्यक्ष अॅड. पाटणे यांनी न्ह न्यायमूर्ती डिगे यांची भेट घेतली. त्या वेळी सोबत अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न बारचे कोषाध्यक्ष अॅड. राकेश भाटकर उपस्थित होते. जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माधव जामदार यांनी या प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याची माहिती अॅड. पाटणे यांनी दिली.

सध्या गाडीतळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये सहकार कोर्ट भरवले जाते; परंतु ती जागा सर्व दृष्टीने अत्यंत गैरसोयीची आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये सहकार कोर्टाची सोय होणे सहजशक्य आहे. ठाणे येथे न्यायालयाची नवीन इमारत झाल्यावर सहकारी न्यायालयासाठी काही भाग देण्यात आला आहे. बारचे सदस्य आणि संपूर्ण जिल्ह्यातून सहकार न्यायालयात येणारे पक्षकार यांच्या अडचणीचा सहानभूतीपूर्वक विचार करून सहकार न्यायालयाच्या कैंपसाठी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे.

सहकार न्यायालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्यास नवीन इमारत साकरात येईल. त्याआधारे संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या पक्षकारांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

Samarth gold

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 18/Oct/2024