मंडणगडात शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम

मंडणगड : येथील दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ‘विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना जनजागृती’ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी लिपिक बाबासाहेब पाटील व प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम, प्रा. साई पवार, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते. स्वागत प्रा. महादेव वाघ, प्रास्ताविक अशोक कंठाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साई पवार, तर आभार प्रदर्शन प्रा. प्राची कदम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 09/Aug/2025

Shanti 3