रत्नागिरी : खासगी बसमध्ये महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला. या घटनेमुळे बसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने चालकाने बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली. दरम्यान पोलीस ठाण्यात बस आणल्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली. मात्र महिलेने तक्रार दाखल न केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल होवू शकला नाही.
संबंधित बस ही सिंधुदुर्ग येथून मुंबईच्या दिशेने जात होती. मुंबई गोवा महामार्गावरून ही बस जात असताना महिलेने बसमध्ये आपली छेड काढण्यात आल्याचे सांगताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बस नजीकच्या रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली. दरम्यान बराच वेळ ही बस रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात उभी ठेवण्यात आली होती. नंतर महिलेकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात न आल्याने पुन्हा बस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 11-08-2025














