लांजा : वेरळ घाटात कंटेनर पलटी

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा जवळील वेरळ घाटात गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होण्याची घटना रविवारी घडली. या अपघातामुळे घाटामध्ये केवळ एकेरी वाहतूक सुरू असून, महामार्गावरील वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

घटनास्थळी पोलिस तत्काळ दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेरळ घाट हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खबरदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 11/Aug/2025