रत्नागिरी, सिंधुदुर्ग आरती स्पर्धेत गुहागरचे सुरभी मंडळ द्वितीय

गुहागर : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित संगीत आरती स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खालचापाट येथील सुरभी आरती मंडळाने द्वितीय क्रमांक पटकवला. या स्पर्धेत १५ आरती मंडळानी सहभाग घेतला होता.

या आरती मंडळात स्नेहा परचुरे, तनुजा भावे, स्मिता कानिटकर, दीपाली परचुरे, ज्योती परचुरे, मनवा सावरकर, वीणा खरे, सई दामले यांचा सहभाग होता. त्यांना तबला साथ प्रकाश तांबे, ऑर्गन साथ चिन्मय सावरकर, चकवी, झाँज ऋषिकेश भावे यांनी साथ दिली. संगीत मार्गदर्शन अरुण परचुरे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 12/Aug/2025