चिपळूण : शहरातील बाजारपेठेतील गांधीचौक परिसरातील गजानन स्टोअर्समध्ये शॉर्टसर्किटने किरकोळ आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी १ वाजता घडली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले.
बाजारपेठेतील गांधीचौक येथील एका कॉम्प्लेक्समध्ये गजानन स्टोअर्सचे दुकान असून, येथे अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. दुकानात पुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य तसेच येथे अन्य दुकानेही लागूनच असल्याने या घटनेची माहिती तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली. त्याप्रमाणे बंबासह काही मिनिटातच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. शॉर्टसर्किटने आग लागल्याने या भागातील वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या घटनेत दुकानदाराचे किरकोळ नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 13/Aug/2025














