खेड : खेड तालुक्यातील मुरडे डिंगलवाडी परिसरात मंगळवारी दुपारी अपघात घडला. मारुती आर्टिगा कारचा एअरबॅग अचानक उघडल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकअप शेडमध्ये घुसली. हा अपघात खेड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर झाला असून, या घटनेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताच्या वेळी गाडीत एक लहान मुलगा देखील प्रवास करत होता.
सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत केली असून, खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि एअरबॅग अचानक उघडण्यामागील कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 13/Aug/2025














