राजापुरातील विरोधकांचीही कामे करणार : आमदार किरण सामंत

लांजा : राजापूर मतदारसंघातील रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी व विविध उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. कितीही विरोध केला तरी मी विरोधकांचेही काम करणार आहे. जनतेच्या न्यायहक्कासाठी यापुढेही जनता दरबार घेतले जाणार असून, लांजा शहरवासीयांना अभिप्रेत असणारा विकास करणार असल्याचे आमदार किरण सांमत यांनी जनता दरबारात सांगितले.

लांजा समन्वय समितीच्या मागणीनुसार, विविध समस्या सोडवण्यासाठी आग्रे हॉल येथे पार पडलेल्या जनता दरबारात शहरातील रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, वाहतूक अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी सांमत बोलत होते. या वेळी सामंत म्हणाले, जनतेच्या समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे. प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधून तत्काळ निराकरण करण्यावर भर आहे. माझ्याकडे समस्या घेऊन आलेली व्यक्ती हा माझा विरोधक असला तरी त्याचे काम मी नक्की करून देतो. मतदारसंघातील रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी व विविध उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी उद्योगमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 13/Aug/2025