मंडणगड : कुडुक खुर्द मधील स्वयंसहाय्यता समूहाने सुरु केलाय लघु उद्योग

मंडणगड : जननी स्वयंसहाय्यता समूह व रुक्मिणी स्वयंसहाय्यता समूह या कुडुक खुर्द गावातील दोन बचत समूहांनी एकत्रित येवून पत्रावळी बनवण्याचा लघु उद्योग सुरु केला आहे. या लघु उद्योगाचे उद्घाटन तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन अमित सरमळकर यांच्या हस्ते 4 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले.

पत्रावळी बनवण्याच्या या लघु उद्योगासाठी स्वयंसहायता समूहांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सहकार्य करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात उमेद अभियानाचे अमित सरमळकर यांनी पत्रावळीचा व्यवसायाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी प्रभाग संघ व्यवस्थापक शुभ्रा कदम व स्वयंसहाय्यता बचत समूहांच्या अध्यक्ष व सदस्या उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 13/Aug/2025