रत्नागिरी : स्वामित्व गावठाण भूमापन योजनेंतर्गत जिल्ह्यातील मंडणगड व रत्नागिरी तालुक्यांमध्ये गावकऱ्यांना सनद वाटप करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात उप अधीक्षक, भूमी अभिलेख यांच्यामार्फत जुलै २०२५ मध्ये मौजे लोकरवन, उमरोली, राजवली, जावळे, आसावळे, तुळशी, कळकवणे, धामणी, गुढेघर या गावांमध्ये एकूण ५६० सनद वाटप करण्यात आले असून, सनद शुल्क म्हणून २ लाख ५८ हजार रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.
उप अधीक्षक, भूमी अभिलेख रत्नागिरी यांच्यामार्फत रत्नागिरी तालुक्यातील मौजे पानवल व रनपार या गावांमध्ये एकूण १०६ सनद वाटप करून १ लाख १० हजार ९७५ रुपये सनद शुल्क वसूल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी इतर तालुक्यांमध्येही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस. एस. इंगळी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 13/Aug/2025












