चिपळूण : पाग पॉवरहाऊस येथे विजेची व्यवस्था

अडरे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाग पॉवरहाऊस दुभाजक येथे अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. याबाबत येथील सुयोग चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर याठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाग भागातील रहिवाशांना महामार्ग ओलांडताना रात्रीच्या अंधारात मोठी अडचण येत होती. या समस्येकडे लक्ष वेधून सुयोग चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली. आता येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही भाग अंधारात असल्याने संपूर्ण सुरक्षितता झालेली नाही. येथे आणखी एक हायमास्ट बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 13/Aug/2025