रत्नागिरी : जिल्ह्यातील गोविंदा पथके १६ ऑगस्ट रोजी दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. या वर्षी जिल्ह्यात सार्वजनिक २७० आणि २,४८० खासगी अशा एकूण २,७५० हंड्या फुटणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये १९ ने वाढ झाली आहे. मात्र, खासगी दहीहंड्यांमध्ये १३२ ने दहीहंड्यांची घट झाली आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी दहीहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण केली आहे. त्यामुळे या वर्षी दहीहंडीचा जल्लोष व बक्षीस पटकावण्यासाठी मंडळांमधील चुरस व थरार पाहायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांकडून जोरदार सराव सुरू झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात २५१ सार्वजनिक तर २,६१२ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. या वर्षी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये १९ ने वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सवाची रंगत वाढणार आहे. मात्र, खासगी दहीहंड्यांचे प्रमाण कमी झाले असून, या वर्षी १३२ हंड्या कमी झाल्या आहेत. या उत्सवासाठी गोविंदा पथके गेला महिनाभर सराव करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 PM 13/Aug/2025












