रत्नागिरीत ‘राधाकृष्ण श्री २०२५’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेश गोसावी ठरला ‘राधाकृष्ण श्री’ चा मानकरी

रत्नागिरी : राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘राधाकृष्ण श्री २०२५’ शरीरसौष्ठव स्पर्धेला रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा मानाचा “राधाकृष्ण श्री २०२५” किताब गणेश गोसावी याने पटकावला. त्याचबरोबर, ज्ञानेश शिंदे याला बेस्ट पोझर आणि रोशन बामणे याला उगवता तारा म्हणून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन श्री. बिपिनचंद्र गांधी आणि डॉ. निनाद लुब्री यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजू, सौरभ मलुष्टे, राजेश रेडीज, योगेश मलुष्टे, मिलिंद दळी, निलेश मलुष्टे, समीर गांधी, दिनेश जठार, गणेश भिंगार्डे, सदानंद जोशी, जितेंद्र नाचणकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हेमंत वणजू यांचा सत्कार बिपिनचंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, आडिवऱ्यातील महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. शेट्ये यांचा सत्कार वीरेंद्र वणजू यांनी केला. रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सौरभ मलुष्टे यांचा सत्कार डॉ. निनाद लुब्री यांनी केला.


स्पर्धेतील विजेत्यांची यादी:

ही स्पर्धा एकूण चार गटांमध्ये घेण्यात आली होती. प्रत्येक गटातील विजेते पुढीलप्रमाणे आहेत :

  • पहिला गट:
    • प्रथम: प्रसन्न भरत घाणेकर
    • द्वितीय: ज्ञानेश साईराज शिंदे
    • तृतीय: राजेंद्र किसन बंडबे
    • चौथा: संतोष माधव पावसकर
    • पाचवा: किरण नारायण जाधव
  • दुसरा गट:
    • प्रथम: सुयोग संतोष पदुमले
    • द्वितीय: राज रुपेश गावकर
    • तृतीय: शुभम हरिश्चंद्र हुमणे
    • चौथा: दीपक दत्ताराम विजीतकर
    • पाचवा: संकेत सुधाकर साळवी
  • तिसरा गट:
    • प्रथम: गणेश संजय गोसावी
    • द्वितीय: संजय शिवाजी डेरवणकर
    • तृतीय: अनिश सखाराम शेंडेकर
    • चौथा: आर्यन दिनेश घाणेकर
    • पाचवा: संदेश शिवाजी गवाणकर
  • चौथा गट:
    • प्रथम: ओंकार दिनेश सुर्वे
    • द्वितीय: अभिनंदन सुधीर सातोपे
    • तृतीय: फैजान रहिम मुल्ला
    • चौथा: अनुप प्रकाश पेडणेकर
    • पाचवा: रोहन विद्याधर भालेकर

मानकरी आणि बक्षीस वितरण सोहळा

या स्पर्धेत, तिसऱ्या गटातील विजेते ठरलेले गणेश गोसावी यांना संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल “राधाकृष्ण श्री २०२५” चा मानकरी घोषित करण्यात आले. वीरेंद्र वणजू यांच्या हस्ते त्यांना मानाचा पट्टा प्रदान करण्यात आला, तर संस्थेचे कार्यकारी सदस्य सिद्धार्थ बेंडके आणि मिलिंद दळी यांच्या हस्ते आकर्षक शिल्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या बक्षीस वितरण सोहळ्याला अजयशेठ गांधी, निलेश मलुष्टे, हर्षद रेडीज, ऋषी धुंदूर, सदानंद जोशी, नरेंद्र वणजू, सचिन केसरकर, मुकुल रेडीज, मनोर दळी, सुनील बेंडखळे, समीर रेडीज, अजिंक्य धुंदूर, बाबा शेट्ये यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. या यशस्वी आयोजनामुळे राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या शताब्दी वर्षाची सुरूवात दिमाखदार पद्धतीने झाली आहे.