चिपळूण : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे दि. १४ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने ते चिपळूणसह रत्नागिरी येथे भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
१३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वा. मुंबई येथून ते कोकणकन्या एक्स्प्रेसने चिपळूणकडे प्रयाण करतील. दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वा. चिपळूण येथे आगमन व विश्रांती, सकाळी ८: ३० वा. ‘आमचा देवाभाऊ’ या अभियान अंतर्गत राख्यांचे संकलन होईल. त्यानंतर ते पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पास भेट देऊन पाहणी करतील. सकाळी ९:३० वा. रत्नागिरी येथे प्रयाण करतील. ११ वा. रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात राखी संकलन होईल.
प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता…
मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याप्रसंगी चिपळुणातील एक बडा नेत्याच्या भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून ना. नितेश राणे यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे. त्यात नितेश राणे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 14/Aug/2025












