राजापूर : ‘तो’ रुग्ण अखेर मनोरुग्णालयात दाखल

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात विचित्र अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णामुळे व्यापारी व नागरिकांसह शहरात येणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागत होता. याची माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दखल घेतली असून, शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णाची रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात रवानगी केली.

गेल्या काही वर्षांपासून शहर आणि परिसरात मनोरुग्णांची संख्या वाढली असून, या मनोरुग्णांच्या हरकतींनी सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. काही महिला मनोरुग्णही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत होत्या. या मनोरुग्णांना माजी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांच्या प्रयत्नाने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपचारासाठी मनोरुग्णालयात रत्नागिरी दाखल केले.

या वेळी पोलिस निरीक्षक अमित यादव, राजापूर पालिकेचे मुकादम राजन जाधव, संदेश जाधव, अजिम जैतापकर, परवेज मुंगी, सतीश बंडबे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 14/Aug/2025

Tata sierra