राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा सोलगाव नं. २ येथील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आरोग्याला संजीवनी मिळवून देणाऱ्या पोषक रानभाज्यांची माहिती जाणून घेतली. त्यासाठी जंगलभागात जाऊन विद्यार्थ्यांना या रानभाज्या दाखवण्यात आल्या.
सोलगाव शाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ राजाराम कामतेकर, संतोष गावेलकर, साहाय्यक शिक्षक लक्ष्मण फडके, विशाल सपकाळ, विठ्ठल मंगे, स्वयंपाकी पुष्पमाला नांगरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. पावसाळ्यात तयार होणाऱ्या रानभाज्यांची मुलांना माहिती मिळावी आणि वाढत्या जंगलतोडीमध्ये या रानभाज्यांचे संवर्धन होण्याच्यादृष्टीने जनजागृती व्हावी, या उद्देशाने सोलगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना रानभाज्यांची माहिती देण्यात आली.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत प्रशाळेचे मुख्याध्यापक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये धामापूरकर आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गोवेल, अळू, भारंगी, सुरण आदी भाज्यांची प्रत्यक्ष माहिती व त्या ओळखायच्या कशा याबाबत सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 14/Aug/2025












