इतिहास महाराष्ट्राचा अभिनय स्पर्धेची प्राथमिक फेरी चिपळूणमध्ये उत्साहात

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या सहयोगाने, बालरंगभूमी परिषद रत्नागिरी शाखा आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या विषयावर आधारित अभिनय स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कार्यक्रमाचे निवेदन प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. एकल गटात ५ ते १० वयोगटातील ११ विद्यार्थी तर समूहगटात ५ ते १० आणि १० ते १५ वयोगटातील ६ गटांनी सहभाग घेतला. शहाबाज गोलंदाज व नितीन गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरी १७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे होणार असून, त्यातून निवडलेले विजेते २३ व २४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव नाट्यगृहात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा टेरव हायस्कूल नं. १ यांच्यावतीने दीपक मोने, अनंत पवार, निशिगंधा कांबळे आणि प्रवीण सन्मुख यांनी महाराष्ट्रातील शेकडो गडकिल्ल्यांची माहिती देणारे सचित्र प्रदर्शन सादर केले. ज्यातून विद्यार्थ्यांना इतिहासाचे थेट दर्शन घडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 14-08-2025