‘हर घर तिरंगा’ अंतर्गत रत्नागिरीत बँक ऑफ इंडियातर्फे बाईक रॅली

रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी बँकर्स बाईक रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर ते जयस्तंभआणि परत जयस्तंभ ते बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगरपर्यंत काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया रवींद्र देवरे यांच्याहस्ते झाला.

या रॅलीमध्ये उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया अंजनीकुमार सिंग आझाद, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, नराकास सदस्य सचिव रमेश गायकवाड, झोनल सेक्रेटरी बँक ऑफ इंडिया असोसिएशनचे किरण खोपडे, ललित प्रकाश दीपस्तंभ कार्यालय, तटरक्षक वायू अवस्थानचे २४ जवान, इतर नराकास सदस्य कार्यालये, शहरातील सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रत्नागिरी बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयाचे श्री. कानसे व श्री. गायकवाड यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 14/Aug/2025