राजापूर नगर वाचनालयात पुस्तकांचे प्रदर्शन

राजापूर : राजापूर येथील नगर वाचनालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रंथालयात नवीन आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

यावेळी संस्थेचे सहकार्यवाह सुहास ओळकर, संस्थाध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर, संचालक राजेंद्र रानडे, जयेश हर्डीकर यांच्यासह ग्रंथपाल व कर्मचारी वृंद आणि नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 14-08-2025

Horizon techno.