रत्नागिरी : सध्या शहरांमध्ये अनेक गो पालकांनीच जनावरांना सोडून दिल्याने शहरभर ही मुकी जनावरे दिवसरात्र फिरत असतात. एरव्ही या मुक्या जनावरांना अनेक नागरिक त्यांना हाकलून देत असतात. मात्र, मातृहृदयी महिला आणि आशासेविकेच्या मदतीमुळे अशाच एका भटक्या गाईने भर पावसात वासराला जन्म दिला, शहरातील एसटी कॉलनी येथे बुधवारी १३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एवढेच नव्हे तर या कॉलनीतच तिच्या वासरासह रहाण्याची सोयही त्यांनी केली.
शहरातील माळनाका येथील एस. टी कॉलनीतील चाळ क्रमांक ३ च्या मागे दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास एक गोमाता येथील रहिवासी माधवी डोर्लेकर यांच्या दाराशी आली. त्यांनी तिला खाणे देऊ केले. मात्र, ती प्रसुतीच्या वेदनेने व्याकुळ झालेली त्यांना दिसली. त्यांनी एका खासगी रुग्णालयात कामाला असलेल्या वंदना गोरे यांना याची कल्पना देताच त्या तातडीने आल्या. त्यांनी कुशलतेने गाईची प्रसूती केली. या कॉलनीत राहणाऱ्या आशासेविका अरुणा आखाडे कामावर जातानातिथेच थांबल्या पाऊस मरू होता त्यामळे गाय आणि नवजात वासराची सुरक्षितता महत्त्वाची होती.
आखाडे यांनी त्या परिसरातील
अनेकांकडे या गाईबाबत चौकशी केली. मात्र, गाईच्या मालकाचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी तातडीने नगर परिषदेत फोन करून गाईची व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती केली. थोड्या वेळाने नगर परिषदेचे शैलेश कदम आणि ऋषिकेश शेलार हे दोन कर्मचारी दाखल झाले. अरुणा आखाडे, माधवी डोर्लेकर आणि कल्पना कुरतडकर यांच्यासह है दोन कर्मचारी दुपारपर्यंत तिथेच होते. त्या गाईच्या डोळ्यात त्या महिलांबद्दलची कनवता दिसत होती
वासरासह गाईला मिळाला खोलीमध्ये आसरा
गाईने नुकताच वासराना जन्म दिल्याने ती वासराला कुणाला हात लावू देणार नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. अखेर या लेकुरवाळ्या महिलांनी गोमातेचे वात्सल्य समजून घेतले आणि तिला आपल्या शेजारी असलेल्या एका खोलीत आसरा देण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनंतर गाय व तिच्या वासराला शहरानजीकच्या चंपक मैदान येथील गोठ्यात हलविणार असल्याचे नगर परिषदेने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 14/Aug/2025












