रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्ह्यातील तीन क्रीडा प्रशिक्षण केंद्रांमधील खेळाडूंना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या उपस्थितीत तिन्ही प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे वाटप झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी खेळाडूंना नियमित सरावाचे महत्त्व सांगितले. मान्यताप्राप्त खेळात अतिउच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात सध्या जिम्नॅस्टिक्स, व्हॉलीबॉल आणि खो-खो या तीन खेळांचे मार्गदर्शन केले जाते. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दिले जाते. तेथे गेल्या तीन वर्षांपासून २० ते २५ खेळाडू नियमित प्रशिक्षण घेतात. व्हॉलीबॉल आणि खो-खोचे मार्गदर्शन रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात दिले जाते. तेथे गेल्या दोन वर्षांपासून ४५ ते ५० खेळाडू नियमित प्रशिक्षण घेत आहेत.
खो-खो खेळासाठी ऐश्वर्या सावंत, व्हॉलीबॉलकरिता गणेश खैरमोडे आणि जिम्नॅस्टिक्ससाठी सचिन माडंवकर प्रशिक्षण देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 14-08-2025












