देवरुख: 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मातृमंदिर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, देवरुख येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दोन वर्षांच्या पशुधन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा स्वयंरोजगारात चांगली संधी मिळू शकते.
अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
- हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून मराठी माध्यमातून शिकवला जातो.
- अभ्यासक्रमासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- येथे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
- मागील दोन वर्षांपासून या महाविद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे.
- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या विमुक्त जाती (NT), आणि विशेष मागास प्रवर्ग (VJ) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100% शासकीय शिष्यवृत्ती मिळते.
- इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील मुलींना 100% आणि मुलांना 50% शासकीय शिष्यवृत्तीची सुविधा आहे.
- मुला-मुलींसाठी महाविद्यालयात वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mafsu.ac.in किंवा www.le.mafsu.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे: - शाळा सोडल्याचा दाखला (TC)
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- 10वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- रिंग कार्ड
- जातीचा दाखला
- अधिवास दाखला
- नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र
- गॅप सर्टिफिकेट (लागू असल्यास)
अधिक माहितीसाठी, इच्छुक विद्यार्थी 7741929141, 8380838385, 9075783072, 9834530485 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.











