मुंबई-गोवा महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी भोस्ते घाट व जगबुडी पुल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या. सुदैवाने दोन्ही अपघातांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिला अपघात भोस्ते घाटात झाला. चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या मोटारी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी आपल्या रुग्णवाहिकेसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले.

दुसरा अपघात भरणे नाका नजीकच्या जगबुडी पुलावर घडला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी मोटार रस्त्याच्या धोकादायक स्थितीमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. या घटनेतही प्रसाद गांधी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. नंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मोटार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 15/Aug/2025