खेड शासकीय विश्रामगृहाच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन

खेड : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खेड तालुक्यातील शासकीय विश्रामगृहाच्या नव्या इमारतीच्या पुनर्बाधणी कामाचे उद्घाटन गृहमंत्री (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता होणार आहे.

या समारंभास माजी मंत्री रामदास कदम, राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानदेव मुंडे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना नलगे, पोलीस अधीक्षक नितीन बनगडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आशा जाटाळ, अभियंता निलेश पावसे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 15/Aug/2025