मंडणगड : पावसाळ्यातील आपत्तकालीन परिस्थितीवर मात करत कुठल्याही परिस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी करण्याचे यंत्रणेने निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त तूर्तास लांबणीवर पडला आहे. भरपावसात काम पूर्ण नसताना उद्घाटनाचा अट्टहास कोणी व का केला, असा प्रश्न तालुकावासियांसमोर निर्माण झाला आहे.
गेल्या एक महिन्यापासून न्यायपालिकेसह सर्वच यंत्रणांनी याकरिता कंबर कसून काम केले होते. शेवटच्या टप्प्यात सहाशेहून अधिक कुशल व अकुशल कामगार दिवस-रात्र काम पूर्ण करण्यासाठी झटत होते. कामाचे नियोजन व या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश व मुख्यमंत्री यांच्यासह तालुक्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. दौऱ्याकरिता प्रत्यक्ष काम करणाऱ्यांपेक्षा पाहणी करणाऱ्यांची संख्या अधिक होती. वरिष्ठ पातळीवर सर्वच यंत्रणा गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात डेरेदाखल झालेली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 15/Aug/2025












