चिपळूण : येथील आनंदराव पवार महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आनंदाची घटना घडली आहे. महाविद्यालयातील अकरावीत (सायन्स) शिकणारी वेदिका हरवडे हिला लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा मान मिळाला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात १ ऑगस्टला वक्तृत्त्व स्पर्धेत वेदिकाने उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या मान्यतेपोटी तिला ध्वजवंदनाचा सन्मान देण्यात आला.
स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन प्रा. भालेकर यांनी केले होते. गोवळकोट येथे राहणारी वेदिका ही अत्यंत गुणी आणि जिद्दी विद्यार्थिनी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपले शिक्षण सुरू ठेवले असून, हायस्कूलमध्ये दहावीला ८७.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले होते. वक्तृत्वकलेसोबतच तिला गायनाचीही आवड आहे. वेदिकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, शिक्षक, कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी, रजिस्टर खेडेकर, पीआरओ चोगले यांनी तिचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 15/Aug/2025












