रत्नागिरी : दापोली येथील गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर सुमारे पावणे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी सापडली आहे. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.
अत्यंत चिकट जेलीचा गोळा समुद्रकिनाऱ्यावर पडला होता. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दापोली सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्तांच्या आदेशनुसार अधीक्षक अतुल. व्ही. पोतदार आणि अधीक्षक (हरनाई) विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्य पथकाने शोधमोहीम सुरू केली.
रंगावरून हा पदार्थ अंबरग्रीस किंवा व्हेल वोमीट म्हणजे व्हेल माशाची उलटी असल्याचे दिसून आले. विभागाच्या जलद कारवाईमुळे ४ किलो १४० ग्रॅम अंबरग्रीस जप्त केला. ज्याची किंमत बाजारात ५.४५ कोटी रुपये असल्याचे मानले जाते. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
जर अशा पदार्थाचा बेकायदेशीरपणे वापर करताना आढळले किंवा असा पदार्थ सापडला तर याबाबतची माहिती तत्काळ कळवा, असे आवाहन सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Aug/2025












