मंडणगड : श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रम १६ ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा होणार असून या उत्सवाची जोरदार तयारी शहरासह तालुक्यात सुरु आहे. ‘गोविंदा आले रे आला’च्या जयघोषात थरावर थर रचत दहीहंडीचा उत्सव तालुक्यात साजरा होणार आसून तालुक्यात एकूण ८५३ दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. यासाठी मंडणगड शहर सज्ज झाले आहे.
मंडणगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३ सार्वजनिक व ४८५ खाजगी दहीहंड्या बांधण्यात येणार आहेत. बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे हद्दीत १ सार्वजनीक व ३६७खाजगी दहीहंड्या बांधण्यात येणार आहेत. अशा तालुक्यात एकूण ८५३ दहीहंडी फोडण्यात येणार आहेत. यानिमित्ताने शहरात विविध सांस्कृतीक कार्यक्रमासंह तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडणगड शहरात शहर शिवसेना, ओमसाई गोविंदा पथक, गांधी चौक व दुर्गवाडी ग्रामस्थ, भिंगळोली येथे भिंगळोली गावकी, भाजपा तालुका मंडणगड, युवा सेना यांच्यावतीने कार्यक्रमांची तयारी असून यंदा उंच थरासह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 15/Aug/2025












