रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कस्टम्स कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळ (संरक्षण, प्रतिबंध व निवारण) कायदा २०१२ यावर साक्षरता शिबीर १३ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव, न्यायाधीश श्री. आर. आर. पाटील, बाल न्याय मंडळाच्या सदस्या विनया घाग आणि कस्टम्स कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कृष्ण उपस्थित होते. श्रीमती घाग यांनी कार्यालयामध्ये महिला सहकाऱ्यांशी वागताना पुरुष कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. पॉश कायद्याच्या सविस्तर तरतुदींबाबत आर. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषण संदीप कृष्ण यांनी केले, तर कस्टम ऑफिसर श्री. घागर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 15-08-2025














