रत्नागिरी : मूर्तीकार विश्वनाथ मेस्त्री यांनी साकारली सर्व शिक्षा अभियानाची जनजागृती करणारी गणेशमूर्ती

रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानाची जनजागृती व्हावी यासाठी पाटी-पेन्सिल घेऊन बसलेली गणेशमूर्ती नाखरे येथील विश्वनाथ उर्फ बबलू दत्ताराम मेस्त्री यांच्या चित्रशाळेत साकारण्यात आली आहे.

दरवर्षी दोनशे ते तीनशे शाडू मातीच्या मूर्ती मेस्त्री यांच्या श्री गणेश चित्रशाळेत तयार होतात. सुबक गणेशमूर्ती तयार करण्याचा मेस्त्री यांचा हातखंडा आहे. तेथील सर्वेश मेस्त्री याने सर्व शिक्षा अभियान जनजागृती व्हावी यासाठी पाटी-पेन्सिल घेतलेला गणपती साकारण्यास सांगितले. त्याप्रमाणे मागील आठ दिवसांत मेस्त्री यांनी ही मूर्ती साकारली. अनेक गणेशभक्तांना ही संकल्पना कुतूहलाची वाटली. मेस्त्री हे मूर्ती साकारण्यापासून ते अगदी साचा बनवण्याचे काम चोख करतात.

मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे सध्या बाजारात मिळणारी शाडू माती मळण्याचे मशीनही त्यांनी खरेदी केले आहे. त्यामुळे माती मळण्याचे त्यांचे काम सोपे झाले आहे. प्लास्टरमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी केवळ शाडू मातीची मूर्ती साकारण्यावर त्यांनी भर दिला आहे.

तीन ते चार फुटांच्या मूर्ती
गेली ३५ वर्षे त्यांनी कौशल्यपूर्ण सुबक मूर्ती तयार करून वेगळेपण साधले आहे. गणेशमूर्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. गणेशमूर्ती साकारताना घरातील मंडळींसह गावातील शिक्षण घेणारी मुले त्यांना मदत करत असतात. त्यांची मुलगी सध्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे शिल्पकला शिकत आहे. तिचीही त्यांना मदत मिळते. ती शिक्षण घेत असतानाही ती तीन ते चार फुटांचे गणपती साकारत असे. सध्या गावातील शिक्षण घेत असलेली मुले व गावातील सहकारी असा प्रवास मूर्तीशाळेत सुरू असतो. चित्रशाळेत दिवस-रात्र काम करून ते शाडूच्या मूर्ती तयार होतात.

Amey jwelrs

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 15/Aug/2025