सावर्डे : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आणि टिकाऊ शेतीपद्धतींचा प्रसार करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे रामपूर ग्रामपंचायतीत आयोजित गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील कृषिदुतांनी सांगितले.
यावेळी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते, प्रा. अनिल कांबळे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले, रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अमिता चव्हाण, ग्रामसेवक महादेव शेंडगे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. गोकुळ मिसाळ, निर्मल ग्रामपंचायत कात्रोळीचे सरपंच श्रीकांत निवळक, ग्रामसेवक वर्षा शिंदे आदी उपस्थित होते.
माहिती केंद्रात विविध स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी साधने, नवीन बियाण्यांच्या जाती, प्रगत पाणी व्यवस्थापन तंत्र, सेंद्रिय शेतीपद्धती, कीड व रोग नियंत्रणाचे प्रभावी उपाय आणि उत्पन्न वाढवण्यासाठीच्या नावीन्यपूर्ण पद्धती यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 15/Aug/2025












