लांजा विकास आराखडा मनासारखा होईल : मंत्री नीतेश राणे

लांजा : शहरविकास आराखड्याला जनतेमधून मोठ्याप्रमाणात विरोध होत असून, हा आराखडा जनतेच्या मनाविरुद्ध आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आराखड्याबाबत सगळं तुमच्या मनासारखे होईल, असा विश्वास मंत्री नीतेश राणे यांनी लांजा-कुवे बचाव समितीसह नागरिकांना दिला.

राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता दुपारी त्यांनी लांजा येथे लांजा शहरविकास आराखड्याला विरोध करणाऱ्या लांजा कुवे बचाव समितीसह नागरिकांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, लांजा-कुवे बचाव समितीने यापूर्वी मिरकरवाडा बंदर उद्घाटनावेळी मंत्री राणे यांना भेटून लांजा शहरविकास आराखडा स्थगित करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा झालेल्या या बैठकीत नागरिकांनी आपला विरोध ठामपणे नोंदवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 15/Aug/2025