देवरुख : महिलांसाठी १७ ऑगस्टला लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन

संगमेश्वर : भाजपच्या येथील तालुका शाखेतर्फे १७ ऑगस्ट रोजी महिलांसाठी लोकनृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा देवरुख येथील माटे भोजने सभागृहात दुपारी २ वाजता होणार आहे. नृत्य कालावधी ७ ते १० मिनिटांचा असून, संघात १० सदस्यांपर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये, द्वितीयसाठी ७ हजार, तृतीय ५ हजार आणि चतुर्थ क्रमांकाला ३ हजार रुपयांसह रोख बक्षीस दिले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:24 AM 16/Aug/2025