संगमेश्वर : बुरंबाड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील खालचा वठार येथे श्री देव विष्णू मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी उत्सवाचे १५१ वे वर्ष आहे. दि. १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:32 AM 16/Aug/2025