रानभाज्या संस्कृतीलाही पोषण देतात : प्रा. गिरीश भातडे

राजापूर : रानभाज्या या औषध, पोषण आणि संस्कृती यांचे प्रतीक आहेत. त्या केवळ शरीर नव्हे, तर संस्कृतीलाही पोषण देतात, असे प्रतिपादन प्रा. गिरीश भातडे यांनी केले. राजापूर तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात आयोजित रानभाजी पाककृती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश पवार, सहायक प्राध्यापक डॉ. बाबू सोनार, डॉ. प्रतीक नाटेकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख कविता आमकर यांनी रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन केले होते.

या वेळी पुढे बोलताना प्रा. भातडे यांनी पारंपरिक अन्नसंपदेचे महत्त्व, रानभाज्यांचे आरोग्यदायी गुणधर्म आणि त्यांचा स्थानिक जीवनशैलीशी असलेला सखोल संबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या पाककला स्पर्धेत ३० पाककृती ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी पाककृतीचे परीक्षण प्रमुख पाहुणे प्रा. गिरीश भातडे, शीतल जोशी आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. प्रतिभा रुपणार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 16/Aug/2025