चिपळूण : कामथे खुर्दमध्ये ‘एक पेड माँ के नाम’

चिपळूण : नारी सन्मान प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत कामथे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत पुढील पिढीला देऊ ज्ञान, वृक्ष लागवड राबवू, हा पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. कामथे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ च्या आवारात आणि शेजारील निवडलेल्या जागेत या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि रोपवाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच सरस्वती हरेकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्रतिनिधी बाळासाहेब हरेकर, माजी उपाध्यक्ष किरण हरेकर, ग्रामपंचायत सदस्या अन्विता हरेकर, समिती सदस्या अमृता हरेकर, मयुरी सन्नाक, मुख्याध्यापक बजरंग गुरसळे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमात २०० झाडांची लागवड व १०० रोपांचे वाटप करण्यात आले. काजू, जांभूळ, आवळा, बहावा, करंज, कांचन, साग अशा स्थानिक व उपयोगी झाडांचा समावेश होता. या रोपांची उपलब्धता वनविभाग, चिपळूण व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत मोफत करण्यात आली.

रोपे लावण्यासाठी आवश्यक जागा बाळासाहेब हरेकर यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांचा सन्मान नारी सन्मान प्रतिष्ठानचे विश्वस्त सल्लागार यशवंत पेढांबकर यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच सरस्वती हरेकर यांचा पर्यावरणस्नेही वृत्तीबद्दल सन्मान वृक्ष देऊन करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 16/Aug/2025