मंडणगड : पावसाची मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे शनिवारी सकाळच्या दरम्यान आंबडवे राजेवाडी महामार्गावरील तुळशी घाटात ठिकठिकाणी रस्त्यावर दरड आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली. तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या सूचनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे.
आंबडवे ते राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणात तालुक्यातील तुळशी घाटाचे मागील वर्षी रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे नव्याने रुंदीकरण करण्यात आलेल्या या घाटातील दरड कोसळण्याचा सिलसिला गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 18/Aug/2025














