देवरुख : नजीकच्या मौजे पाटगाव येथे देवरुख रत्नागिरी या रस्त्याच्या बाजूला काळा बिबट्या आजारी अवस्थेत रविवारी आढळून आला, त्या बाबतची बातमी ग्रामस्थ पाटगाव यांनी वनपाल संगमेश्वर देवरुख यांना दिली. बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतला असून त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.
वनविभाग कर्मचारी साहित्यासह जाऊन खात्री केली असता बिबट्या निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सक विभाग देवरुख डॉ. श्री युवराज शेट्ये यांना बोलावून त्यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. उपासमारीमुळे काळा बिबट हा निपचिप पडला असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
बिबट्या नर असुन त्याचे वय अंदाजे एक वर्षे आहे, तसेच डॉक्टर संतोष वाळवेकर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर वनविभाग, डॉ. निखिल बनगर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी सातारा वनविभाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प श्री. कुंभार पशुपर्यवेक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याची वैद्यकीय उपचार चालू आहे. यावेळी घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख, न्हानू गावडे, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, प्रतिक मोरे डॉ सार्दुल केळकर, विराज आठल्ये, डॉ प्रितेश आढाव रा देवरूख हे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 18/Aug/2025














