खानू येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला मारहाण

रत्नागिरी : मद्याच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून दुखापत करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दीपक कृष्णा सुतार (रा. खानू, सुतारवाडी, रत्नागिरी) असे दुखापत करणाऱ्या पतीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास खानू सुतारवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि संशयित हे नात्याने पती-पत्नी आहेत. दीपकला दारूचे व्यसन आहे.

शुक्रवारी मद्याच्या नशेत त्याने पत्नी झोपलेली असताना तिच्या तोंडावर मारून तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिचे डोके भिंतीला आपटून दुखापत केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 18/Aug/2025

Dr amey pathak