रत्नागिरी : गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. फहाद मुश्ताक पाटणकर (वय ३२, रा. ऑर्चिड अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण हा बेकायदेशीर गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विनोद कदम यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 18/Aug/2025