कामथे येथील अपघातात चालक थोडक्यात बचावला

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे शनिवारी (ता. १६) दुपारी भरधाव मोटारीला भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोटार मुंबईहून गोव्याच्या दिशेने वेगाने जात होती. कामथे येथे पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि मोटार दुभाजकावर आदळली. याचवेळी बाजूने जात असलेल्या ट्रेलरलाही मोटारीची धडक बसली. त्यामुळे मोटार दुभाजकावरच अडकली. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून गंभीर अनर्थ टळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 18/Aug/2025