स्वयंपूर्णतेकडे आत्मविश्वासाने पाऊल – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, BKVTI रत्नागिरीत विविध व्यावसायिक कोर्सेसचे उद्घाटन व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी | 18 ऑगस्ट 2025
बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी केंद्रामार्फत मारुती मंदिर येथे ट्रॅव्हल टुरिझम, इंटेरियर डिझाईनिंग, फॅशन डिझाइनिंग, कॉस्मेटॉलॉजी अँड सलून मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग या एक वर्षाच्या व्यावसायिक डिप्लोमा कोर्सेसचे उद्घाटन आणि नवोदित विद्यार्थिनींसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने श्री. स्वप्नील सावंत यांनी केली. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकत संस्थेच्या महिलांसाठी चालवलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन देसाई बंधू उद्योग समूह, पावस – रत्नागिरीच्या व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था रत्नागिरी प्रकल्प स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. अदिती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा व्यावसायिक प्रशिक्षणांची गरज आणि महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंत देसाई होते. त्यांनी समारोप करताना उपस्थित विद्यार्थिनींना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशस्वी भवितव्य घडवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमामध्ये कोर्स कोऑर्डिनेटर सौ. साधना ठाकूर यांनी विविध डिप्लोमा कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. यावेळी LMC सदस्य सी.ए. श्री. आनंद पंडित, श्री. दीपक जोशी, सौ. स्वरूपा सरदेसाई, सल्लागार समिती सदस्या सौ. शर्वरी किरपेकर व सौ. मेधा कुलकर्णी, BCA कॉलेज प्रभारी प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, व्हिजिटिंग फॅकल्टी सौ. कविता सावंत याही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सिद्धी करंदीकर यांनी तर आभार प्रदर्शन कु. प्रीतम पावसकर यांनी केले.
या कार्यक्रमात एकूण 22 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या करिअरसाठी BKVTI संस्थेची निवड केल्याचे समाधान व्यक्त केले.

BKVTI रत्नागिरीने महिलांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी घेतलेले हे पुढचे पाऊल, समाजातील स्त्रीशक्तीला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 19-08-2025