लांजा-राजापूर-संगमेश्वर उत्कर्ष मंडळातर्फे २४ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव

रत्नागिरी : लांजा-राजापूर-संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या २४ मान्यवर महिलांना नवदुर्गा पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. मंडळातर्फे २४ महिलांपैकी १४ महिलांचा सन्मान मंडळाने तीन तालुक्यात केलेल्या दौऱ्याप्रसंगी करण्यात आला, तर १० महिलांचा सन्मान मुंबईत नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी मुंबईमध्ये स्नेहा धारप, ज्योती माहिते, ज्योती परब, अर्चना गुरव, अनिता देवधर, अंजली तांबडे, ज्योती पाटणकर, अमया मोहिते, विजया साळुंखे व शुभांगी बापट या महिलांना गौरवण्यात आले. यावेळी मंडळाच्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शैलेश मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस मधुकर पवार, शीला चाचड, प्रशांत साळुंखे, शंकर सुर्वे, राजाराम मिरगुले, राजेश इंगळे, शुभांगी वेंगुर्लेकर, रिना भाताडे, पंढरीनाथ राणे आदींनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 19/Aug/2025