खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पोलादपूरजवळ चिपळूणवरून गुजरातकडे माल घेऊन जाणारा ट्रक घाटाच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात ट्रकचालकाला दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलादपूर पोलिस दाखल झाले असून, अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळासाठी अडथळा निर्माण झाला. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पाऊस व निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 19/Aug/2025












