मंडणगड : मंडणगड तालुक्यातील कुंभार्ली शिवमंदिर परिसरात मगरीचा मुक्त संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रहदारीच्या रस्त्यावर या मगर चालताना दिसून आली आहे. तालुक्यात तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिराच्या परिसरात पुरातन तळ्यातील मोठ्या मगर रहदारीच्या रस्त्यावर संचार करत आहेत. या तलावात दोन किंवा तीन मोठ्या व काही लहान मगरींचे अस्तित्व आहे.
सावित्री खाडीला लागून असलेल्या वहाळातून या मगरी तलावापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतत पडणाऱ्या पावसात तलावातील जलसाठा वाढल्यामुळे मगरी जलाशयाच्या बाहेर आल्या आहेत. मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलावरून ओढ्याकडे जाऊ लागल्या आहेत. वाटेत येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशाच्या दिशेनेही धावताना दिसून येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 19/Aug/2025












