रत्नागिरी:
गोपाळ काला उत्सवानिमित्त श्री दत्तप्रसादिक मित्र मंडळ, घुडेवठार यांच्या वतीने आणि श्री. अमित विलणकर यांच्या पुरस्कृत भव्य राधा-कृष्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत उपस्थितांची मने जिंकली. यात कु. गार्गी शैलेश बोरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
रत्नागिरी तेली समाज सेवा संघ हॉल येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन श्री. अमित विलणकर, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, शहर अध्यक्ष श्री. दादा ढेकणे, माजी नगरसेविका सौ. सत्यवती बोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील लहान मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला.
स्पर्धेत कु. हर्ष प्रथमेश घुडे याने द्वितीय, तर कु. मीत श्रीकार घुडे याने तृतीय क्रमांक मिळवला. कबीर घुडे, समर्था भाटकर, विहान तोडणकर आणि वीरा तोडणकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सौ. अपर्णा गोगटे आणि सौ. आसावरी पावसकर यांनी केले. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 19-08-2025












