खेड : तालुक्यातील असगणी गावात राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिवराम महाडीक ( ४३, व्यवसाय ड्रायव्हर, रा. असगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत लोखंडी अँगलला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 19/Aug/2025












