सातारा : मूळ रत्नागिरी येथील आणि सध्या वडूथ ता. सातारा येथे राहणाऱ्या शुभ्रा प्रवीण राणे (वय ११,) या सहावीतील मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. बहीण-भावंडे खेळत असताना भावाला जखम झाल्याने आई-वडील ओरडतील या भितीतून या मुलीने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी घडली.
अधिक माहिती अशी, राणे कुटुंबिय मूळचे रत्नागिरी येथील आहे. ते गेल्या ३ वर्षांपासून वडूथ या गावी राहत आहेत. शुभ्राचे आई-वडील वडापाव विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सोमवारी शुभ्रा भांवडांसह घरी खेळत होती. यावेळी लागल्यानंतर शुभ्रा घाबरली. आपल्याला ओरडा बसेल या भितीने राहते घरीच तीने गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबियांनी तिला तात्काळ सिव्हीलमध्ये नेले. मात्र उपचरापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका भावाला
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 20/Aug/2025












